राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी गोयल

टीम ई-सकाळ
मंगळवार, 16 जुलै 2019

भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली.

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली.

तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कामगार आयुक्त आर. आर. जाधव यांची मत्स आयुक्तपदी बदली झाली. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची कामगार आयुक्तपदी, मुंबई येथे बदली करण्यात आली.

तसेच जात पडताळणी समितीचे अध्यक्ष यू. ए. जाधव यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बदली झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of IAS officers in the state Goyal as Additional Commissioner of Pune