वाहतूक शाखेची अर्ध्या कोटीची उड्डाणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सातारा - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या शहर वाहतूक शाखेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये ३४ हजार ९८३ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सातारा - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या शहर वाहतूक शाखेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये ३४ हजार ९८३ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सातारा शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. वाहतूक नियमनाचे काम करण्याबरोबरच वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामध्ये कागदपत्र जवळ न बाळगणे, नियमानुसार नंबर प्लेट नसणे, वाहतूक चिन्हांचे उल्लंघन करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, बेदरकारपणे व अपघात होऊ शकतो अशा पद्धतीने वाहन चालविणे, दुचाकीवरून तिघांचा प्रवास, वाहनाच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृतपणे बदल करणे, सिटबेल्ट नसणे आदी बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले जाते. नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्यांवर वाहतूक शाखेमार्फत कारवाई केली जाते. 

गेल्या आर्थिक वर्षामध्ये वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईत उल्लेखनीय काम केले आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ अखेर ३४ हजार ९८३ वाहनांवर कारवाई करून ५८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये ट्रिलप सीट वाहन चालविणाऱ्यांवर दोन हजार १९३ कारवाया करून तीन लाख ४६ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला. फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या एक हजार ९० वाहनचालकांकडून एक लाख ८५ हजार ३०० रुपये तर, मोठा हॉर्न असलेल्या ६८ वाहनचालकांकडून ३४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर अशा प्रकाराचे हॉर्न काढून टाकण्याची कारवाईही करण्यात आली आहे.

Web Title: transport sector half million fine recovery