ट्रॅव्हल गाईड व्हायचंय ? मग इथे करा ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने राज्यातील चौदा प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
ट्रॅव्हल गाईड
ट्रॅव्हल गाईड Sakal

जुन्नर : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने राज्यातील चौदा प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यासह श्रीवर्धन,अलिबाग, मुरुड,फलटण,मुरबाड,भंडारदरा,सिंधुदुर्ग, औरंगाबाद,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,रत्नागिरी, लोणार,अहमदनगर व नाशिक या चौदा पर्यटन स्थळांचा समावेश आहे. येथे पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी भाग घेऊ इच्छिणाऱ्यानी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन पुणे विभागाच्या पर्यटन सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी केले आहे.

ट्रॅव्हल गाईड
अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

पर्यटनवृद्धीला चालना तसेच स्थानिक युवकांना रोजगार अशा दुहेरी हेतूने सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. गावचे किल्ले, डोंगर, दऱ्या,मंदिरे,ऐतिहासिक संग्रहालय किंवा सामाजिक,सांस्कृतिक,नैसर्गिक वरदान लाभलेल्या कोणत्याही स्थळाची माहिती संकलित करण्याच्या आवडीला करिअर मध्ये रूपांतरित करण्याची चांगली संधी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय घेऊन आले आहे.

सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थीना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने स्थानिक पर्यटनाची माहिती,नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हे तज्ञ प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.

ट्रॅव्हल गाईड
पुणे : जिल्ह्यातील पाणवठ्यांवर पाणबदकांचे वास्तव्य

या प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी उमेदवाराचे वय १८ वर्ष वा त्यापेक्षा अधिक असावे. शिक्षण ४० वर्षापेक्षा कमी वय असल्यास किमान १२ वी उत्तीर्ण आणि ४० वर्षापेक्षा अधिक वय असल्यास किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाने केले आहे.

"या प्रशिक्षणातून प्रशिक्षित गाईड निर्माण होतील.त्यामुळे जबाबदार जुन्नर पर्यटन वाढीस चालना मिळेल.जुन्नर मधील पर्यटन स्थळांची प्रसिद्धी होईल. त्याच बरोबर शिवनेरी व इतर पर्यटन स्थळे पर्यटकांना पाहण्यासाठी मदत होईल."

- यश मस्करे. अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com