पर्यावरण रक्षणासाठी शिवप्रेमीचा कोल्हापूर ते रायगड सायकल प्रवास

सुनील पाटकर
मंगळवार, 5 जून 2018

महाड : रायगडावर साजरा होणारऱ्या शिवराज्याभिषेकदिनासाठी विविध भागातून हजारो शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने येत असतात. खांद्यावर भगवा झेंडा, हातात ज्योत, कुणी पायी तर कोण पालखी घेऊन रायगड वारी करतात. यावळी मात्र पर्यावरण वाचवा, देश वाचवा हा संदेश घेऊन कोल्हापूरहून साकलने निघालेला एक शिवप्रेमी सर्वांचे आकर्षण ठरला आहे. 

कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे या गावातील पंढरीनाथ दत्तात्रेय पाटील हा 19 वर्षाचा तरुण शिवरायांवरील निष्ठेमुळे हे धाडस करत आहे. बी ए च्या तिसऱ्या वर्षात शिकणारा पंढरीनाथ शिवराज्याभिषेकदिनाला रायगडावर मित्रांसोबत निघाला होती. परंतु, काहीतरी वेगळे करायची त्याची इच्छा होती. यातून त्याला कोल्हापूर ते रायगड असा सायकल प्रवास करुन पर्यावरण वाचवा देश वाचवा असा संदेश गावोगावी देऊन शिवरायांना अभिवादन करण्याची कल्पना सुचली. वडील शेतकरी, घरची गरीबी, खिशात पैसे नाही अशा अवस्थेत हा शिवप्रेमी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठे पोटी 30 मे ला कोल्हापूराहून निघाला आहे. प्रवासात रात्री देवळात झोपायचे आणि एकवेळच जेवण करत हा  4 जुनला रायगडावर दाखला झाला. सायकलसह रायगड किल्ला चढावयाचा ही त्याची इच्छा असुन पुरातत्व विभागाने परवानगी दिल्यास तो हा प्रयत्नही आहे.
 
Web Title: Travel from Kolhapur to Raigad Cycle for Sivaprimi for environmental protection