आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दोन डिसेंबरपासून प्रशिक्षण

Competition-Exam
Competition-Exam

मंचर - राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षण सत्र दोन डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 

प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र मंचर (ता. आंबेगाव) पोस्ट कार्यालय इमारतीत (घोडेगाव रस्ता) बुधवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख वि. वि. कानिटकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना दर महिन्याला एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. १०२ व्या प्रशिक्षण सत्रात सरकारच्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये वर्ग तीन या पदाची नोकर भरती कर्मचारी निवड (लिपिक, टंकलेखक, कर्मचारी, चयन आयोग, रेल्वे रिक्रूटमेंट आयोग, लोकसेवा आयोग) यांच्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. उमेदवारांना साडेतीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण हे पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी लिपिक योग्यता, बौद्धिक चाचणी व सामान्यज्ञान हे विषय शिकविले जातात. उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केले जाते.’’ 

१८ ते ३८ वयोगटातील दहावी उत्तीर्ण मुला मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मुळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह बुधवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता मंचरच्या कार्यालयात उपस्थित राहावे. दूरध्वनी क्रमांक (०२१३३) २२३०८१ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com