'सकाळ'मुळेच महिलांना सन्मान- दिलीप वळसे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मंचर - ""सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याची "सकाळ'ची जुनी परंपरा आहे. जलयुक्त शिवार योजनेला व्यापक प्रसिद्धी तर दिलीच; पण त्याबरोबर जलयुक्त शिवार योजनेत प्रत्यक्ष सहभागी होऊन दर्जेदार कामांद्वारे अनेक गावांत शाश्‍वत पाणी उपलब्ध करून दिले. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना खऱ्याअर्थाने सन्मान मिळवून देण्यासाठी "सकाळ'ने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे,'' असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे गोवर्धन दूध प्रकल्पाच्या वतीने तनिष्का व्यासपीठाच्या स्वप्ना नरेंद्र काळे, अरुणा रामदास टेके, पुष्पलता वामनराव जाधव या उमेदवारांचा सत्कार वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, गोवर्धन दूधचे कार्यकारी संचालक प्रीतम शहा उपस्थित होते. 

वळसे-पाटील म्हणाले, ""तनिष्का व्यासपीठाची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणारे उमेदवार एकत्रितपणे प्रचार करत होते. विनापोलिस बंदोबस्तात पार पडलेली ही एकमेव निवडणूक आहे. हे दुर्मिळ दृश्‍य पाहावयास मिळाले, ते "सकाळ' च्या पुढाकारामुळेच. तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांनी पर्यावरण, वृक्षलागवड, आरोग्य शिबिरे, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करावी. या उपक्रमासाठी आवश्‍यक असलेली मदत उपलब्ध करून दिली जाईल.'' अक्षाली शहा यांनी आभार मानले. पौर्णिमा सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: A true honor to women through the platform of Tanishka