'स्मृती इराणी मासिक पाळी आल्यानंतर संसदेत जात नाहीत का?'

smruti irani and trupti desai
smruti irani and trupti desai

मुंबईः संसदेला मंदिर म्हटले जात असून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मासिक पाळी आल्यानंतर संसदेत जात नाहीत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

मासिक पाळीच्या दिवसांत रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकीन घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाणार का? तुम्ही तसे करणार नाही. मग अशा पद्धतीने देवाच्या घरी (मंदिरात) जाणे योग्य आहे का, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी "शबरीमला'प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर दिली होती. देशातील प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यांना प्रार्थना करण्याचा अधिकार आहे; मात्र धर्माचा अनादर करण्याचा नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या. 'आपण देशाच्या संसदेला मंदिरच म्हणतो मग त्या मंदिरामध्ये स्मृती इराणी केंद्रीय मंत्री म्हणून काम करतात. तेव्हा मासिक पाळी आल्यावर त्या काम करत नाहीत का? आपण मासिक पाळी सुरु असतानाही कधी दौरे रद्द केले नाहीत. मी जेव्हा समाजामध्ये एक महिला कार्यकर्ता म्हणून काम करते तेव्हा अनेक कार्यक्रम, नियोजित दौरे असतात. नियोजित दौरा असतानाच अचानक मासिक पाळी आली तर तो दौरा आम्ही रद्द करत नाही. उलट अशा परिस्थितीही आम्ही उत्साहाने काम करतो. तसेच नवरात्र, गणेशोत्सवात आम्हाला अनेक ठिकाणी बोलावले जाते. मात्र, तेव्हा मासिक पाळी येईल म्हणून आम्ही एखादी तारीख देत नाही असे कधीच होत नाही.'

दरम्यान, स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियावर काही मिनिटांतच व्हायरल झाली होती. त्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होण्यास सुरवात झाली. ट्‌विटरवर त्या ट्रोलही झाल्या. राजकीय पक्षांतूनही इराणींच्या भूमिकेविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रोल झाल्यानंतर इराणी यांनी कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला. मी पारशी समाजाचा आणि धार्मिक भावनांचा आदर करते. त्यामुळेच मी न्यायालयात गेले नाही. "मित्रा'च्या घरी रक्ताळलेले सॅनिटरी नॅपकीन घेऊन जाऊ शकेल, अशा व्यक्तीचा मी शोध घेत आहे. ते माझे वैयक्तिक मत होते. मी माझी भूमिकाही मांडू शकत नाही का, असे ट्‌विटही त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com