मुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 

मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 

अवघ्या महिन्याभरातच तुकाराम मुंढेंची मंत्रालयातून बदली करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून त्यांची २२ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईत बदली झाली होती. मंत्रालयात अर्थ विभागात त्यांना आणण्यात आल्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज होते, तर मुंढे यांनाही मंत्रालयात काम करण्यात रस नसल्याचे सांगितले जात होते. गेल्या बारा वर्षांत तेरा वेळेस मुंढे यांची बदली झाली आहे.

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णयही रद्द करणात आले आहेत. नागपूर जिल्हा परिषदेवर २००८ मध्ये सीईओ म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी गैरहजर शिक्षकांचे निलंबन केले.  
सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर व्हीआयपी दर्शन त्यांनी बंद केले होते. नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी असताना अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आणि तेथेच मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी त्यांची बदली झाल्यावर पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली होती.

१२ वर्षांत १३ बदल्या
 महापालिका आयुक्त, सोलापूर
 प्रकल्प अधिकारी, धारणी
 उपजिल्हाधिकारी, नांदेड
 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद
 अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नाशिक
 के. व्ही. आय. सी. मुंबई
 जिल्हाधिकारी, जालना
 जिल्हाधिकारी, सोलापूर
 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई
 आयुक्त, नवी मुंबई महापालिका
 पीएमपीएमएल, पुणे
 नाशिक महापालिका आयुक्त
 मुंबई नियोजन विभाग सहसचिव (नोव्हेंबर २०१८)
 एड्‌स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालक (डिसेंबर २०१८)

Web Title: Tukaram Munde Transfer