लाखो भाविकांमुळे फुलली तुळजापूरनगरी

तुळजापूर - बसच्या टपावर बसून प्रवास करताना भाविक.
तुळजापूर - बसच्या टपावर बसून प्रवास करताना भाविक.

तुळजापूर - आश्विन पौर्णिमा यात्रेनिमित्त रविवारी (ता. १३) लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यात्रेसाठी शनिवारी (ता. १२) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ शहरात सुरू झाला होता. दिवसभरात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. 

तुळजाभवानी मातेच्या आश्विन पौर्णिमा यात्रेनिमित्त राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांतील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून पायी येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू झाला. हातात झांजा, गळ्यात कवड्यांच्या माळा, परडी हातात घेऊन ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात भाविक दर्शनासाठी जात होते.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रविवारी पहाटे देवीची मूर्ती सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आल्यानंतर अभिषेक, धुपारती झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास सोलापूरच्या मानाच्या काठ्या शहरात दाखल झाल्या. सोलापूरच्या अंबाबाई मंदिर आणि जगदंबा मंदिर यांच्या शिवलाड समाजाच्या काठ्यांचे स्वागत करण्यात आले. काठ्या सवाद्य मिरवणुकीने जवाहर गल्लीतील पाटीलवाड्यात आल्या. सायंकाळी तुळजाभवानी मंदिरात प्रस्थान झाले.या नंतर भाविकांनी नैवेद्य तुळजाभवानी मातेस अर्पण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com