तुरीच्या महापुरावर सरकारचा उतारा!

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 29 एप्रिल 2017

घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादेत तिपटीने वाढ

घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादेत तिपटीने वाढ
मुंबई - राज्यात डाळी विशेषतः तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. हमीभावालादेखील शेतकऱ्यांचा तूरखरेदी केला जात नसल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डाळीला उठाव मिळावा, डाळीची खरेदी केली जावी. यासाठी सरकारने डाळीच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी लागू असलेल्या साठवणूक मर्यादेत तिपटीने वाढ केली आहे. खरेदीचा कालावधी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवला आहे.

तूरडाळीने मागील वर्षी भाववाढीचा कहर केला होता. सरकारपुढे तूरडाळीच्या किमती आटोक्‍यात आणण्याचे आव्हान होते. मात्र, यंदा तूरडाळीचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी मॉन्सून चांगला झाल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना शेतकऱ्यांनी राज्यात 9 लाख इतके विक्रमी तूर उत्पादन घेतले.

तूर उत्पादन जादा झाल्याने हमीभावालादेखील तुरीचा उठाव होत नाही, असे दिसून आल्यानंतर केंद्राने राज्याला घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना तूरसाठा करण्याची मर्यादा तिपटीने वाढवला आहे. ही वाढ प्रथम 31 मार्च 2017 रोजी लागू करण्यात आली. ती 31 मे 2017 पर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली. मात्र, या तीन महिन्यांच्या कालावधीतदेखील तूरखेरदीचा प्रश्‍न सुटला नाही.

मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ही मुदत वाढवली आहे. त्यामुळे ही मुदत वाढवून 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीचा उठाव व्हावा, यासाठी ही मुदत आणि साठा खरेदीची मर्यादा वाढवली असल्याचा तर्क यामागे सांगितला जात असला तरीही यामुळे तुरीचा साठा वाढला जाणार आहे. त्यानंतर कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी शक्‍यता सूत्रांकडून व्यक्‍त केली जाते.

साठवणुकीची मर्यादा
- शहराची वर्गवारी- सर्वसाधारण परिस्थितीतील साठा मर्यादा- सुधारित साठा मर्यादा ( क्‍विंटलमध्ये)
- महानगरपालिका क्षेत्र- घाऊक- 3,500---किरकोळ-- 200-- घाऊक- 10500---600
-अ-वर्ग नगरपालिका क्षेत्र- घाऊक- 2500--150---घाऊक--7500---450
-अ-वर्ग महानगरपालिका क्षेत्र वगळून- घाऊक- 1500---150--घाऊक---4500---450

Web Title: turdal purchasing issue