राज्यपाल अजित पवारांना म्हणतात तूच रे भावा, तूच!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 डिसेंबर 2019

सत्ता कोणत्याही पक्षाची असूदे उपमुख्यमंत्री अजित पवारच राहणार, राज्यपालांनी उपमुख्यमंत्री तोच ठेवायला हवा होता फक्त मुख्यमंत्री बदलायला हवा होता अशा शब्दांत लोकांनी अजित पवारांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ​

मुंबई : राष्ट्रवादीत बंड करीत भाजपशी सलगी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेल्या अजित पवारांनी आज नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे अजित पवारांचा शपथविधी सुरु होता तर दुसरीकडे सोशल मीडियावर अजित पवारांची जोरदार खिल्ली उडविली जात होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधासनभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सरकार आणण्याच्या वाटाघाटी या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ करीत असतानाच अजित पवारांनी बंड पुकारले आणि भाजपला साथ देत उपमुख्यमंत्री झाले. मात्र, काहीच दिवसांत त्यांचे बंड शमले आणि ते राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाले. त्यामुळे आता सोशल मीडियार त्यांची तुफान चर्चा आहे. 

शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणाले...

Image result for uddhav thakare ajit pawar

सत्ता कोणत्याही पक्षाची असूदे उपमुख्यमंत्री अजित पवारच राहणार, राज्यपालांनी उपमुख्यमंत्री तोच ठेवायला हवा होता फक्त मुख्यमंत्री बदलायला हवा होता अशा शब्दांत लोकांनी अजित पवारांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, अजित पवारांच्या रुपात पुन्हा गुंडखोरी उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली असा चिमटा काढायलासुद्धा काही लोक विसरलेले नाही.  त्यांचे बंड विसरुन महाविकासआघाडीने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले असले तरी लोकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Ajit Pawar takes oath as deputy CM of maharashtra