Vidhan Sabha 2019 : पार्थ पवारांचा सेल्फी साेशल मीडियावर चर्चेचा विषय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

पार्थ पवार यांनी कर्जत येथील सभेदरम्यान घतलेला सेल्फी सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

कर्जत : सध्या पार्थ पवार यांचा एक सेल्फी खूप चर्चेत आला आहे. त्याचीच सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे. 

आपला भाचा निवडून यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे सध्या फिल्डिंग लावत आहेत. त्यांनी कर्जत येथे गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पार्थ पवार, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर आदी उपस्थित हृोते. यावेळी पार्थ पवार यांनी या सगळ्यांसाेबत सेल्फी घेतला. हाच घेतलेला सर्वांचा सेल्फी सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

parth pawar selfie

यावेळी बाेलताना सुळे यांनी भाजप व राम शिंदे यांच्यावर जाेरदार टीका केली. यावेळी बाेलताना त्या म्हणाल्या की, भाजपचे अंतर्गत सर्वेक्षण सध्या चर्चेत ठरत आहे. याच सर्वेक्षणात एका मंत्र्यांची शीट धाेक्यात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राेहित पवार यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. तसेच त्या पुढे म्हणाल्या, रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का? अशी जहरी टीका त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, पार्थ पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे , पंचायत समिती सदस्य महेंद्र गुंड आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Parth Pawar Clicks a selfie