अडीच लाख घरकुलांचे मोदींच्या हस्ते ई-गृहप्रवेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेतील दोन लाख 50 हजार घरकुलांचा ई-गृहप्रवेश सोहळा शुक्रवारी (ता.19 ) शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पंतप्रधान या वेळी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की सन 2022 पर्यंत "सर्वांसाठी घरे' धोरणाअंतर्गत राज्यातील 10 लाख 51 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काची पक्की घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्याला चार लाख 50 हजार घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे अतिरिक्त सहा लाख घरकुलांच्या उद्दिष्टांची मागणी केली आहे. सहा लाख घरकुले पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असणारा निधी राज्य शासन स्वत:च्या निधीतून उपलब्ध करून देणार आहे. तसेच, ही सर्व घरकुले 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्याला मिळालेल्या 4 लाख 50 हजार घरकुलांपैकी 2 लाख 50 हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी 3 हजार 472 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. या योजनेत लाभार्थ्यांना स्वच्छ भारत अभियान व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शौचालयाचा लाभ दिला जातो. 

Web Title: Two and a half million Gharkul Modi inaugurated by video conference