जमिनीच्या वादातून हत्याकांड; मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर : जमिनीच्या वादातून मेहुण्याने बहीण, बहिणीचा पती, भाची आणि स्वतःच्या मुलासह पाच जणांवर वार करून निर्घृण खून केला. दिघोरीजवळच्या आराधनानगरात ही घटना सोमवारी पहाटे सहा वाजता उघडकीस आली. 
आरोपी विवेक गुलाब पालटकर (वय 42, रा. नवरगाव, ता. मौदा) याने मेहुणे कमलाकर मोतीराम पवनकर (वय 46), बहीण अर्चना (वय 42), तिच्या सासूबाई मीराबाई (वय 68), भाची वेदांती (वय 12) आणि स्वतःचा मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश विवेक पालटकर (वय 5) यांचा खून केला. या हल्ल्यातून आरोपीची मुलगी मिताली आणि भाची वैष्णवी (दोघींचे वय 9 वर्षे) या वाचल्या. कमलाकर पवनकर हे भाजपचे कार्यकर्ते होते. 

पवनकर हे आई मीराबाई, पत्नी अर्चना आणि वेदांती व वैष्णवी यांच्यासह राहत होते. त्यांच्याकडे अर्चनाचा भाऊ विवेक पालटकर याचा मुलगा कृष्णा आणि मुलगी मिताली हेही राहत होते. पवनकर हे इलेक्‍ट्रिक फिटिंग कंत्राटदार असून, त्यांचा प्रॉपर्टीचाही व्यवसाय आहे. विवेक पालटकर हा मूळचा नवरगाव (ता. मौदा) येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर जमीन आहे. त्याला अर्चना ही सख्खी, तर दोन सावत्र बहिणी आहेत. पालटकर याने चार वर्षांपूर्वी पत्नी सविता (वय 26) हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन गळा आवळून खून केला होता. उच्च न्यायालयातून विवेक सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटला होता. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहाबाहेर आला. काल सायंकाळी तो पालटकर बहिणीच्या घरी आला. रात्री एक ते तीनच्या सुमारास मेहुणे, बहीण, सासू मीराबाई, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णा यांचा सब्बलने वार करून त्याने खून केला. सकाळी मिताली आणि वैष्णवी झोपेतून जाग्या झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी अद्याप फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

हत्याकांडाचे मूळ 
विवेक पालटकर याला पत्नीच्या खून प्रकरणात उच्च न्यायालयात खटला लढविण्यासाठी पनवकर यांनी पाच लाख रुपये खर्च केले होते. कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी नवरगाव येथील 10 एकर शेती विकण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विवेक शेती विकण्यास तयार नव्हता. उलट व्यवसाय सुरू करण्यासाठी कमलाकर यांना एक लाख मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे विवेक चिडला होता. 

Web Title: Two child included in the killing of land by land disputes