Heat wave: उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात उष्माघाताने घेतला दोघांचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heat wave

Heat wave: उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात उष्माघाताने घेतला दोघांचा बळी

मराठवाड्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मराठवाड्यासहित राज्यातही उन्हाचा पारा वाढल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्या पुढे गेला आहे. या उष्माघाताने संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक आणि नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी हिंगोली कनेरगाव नाका येथील एका चार वर्षीय चिमुकलीचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला होता.

आता मराठवाड्यात उष्माघाताच्या बळीची संख्या एकूण ३ वर गेली आहे. हिमायतनगर (जिल्हा नांदेड) येथील २८ वर्षीय विशाल रामराव मादसवार यांनी शुक्रवारी दिवसभर शेतात काम केले. घरी आल्यावर रात्री जेवणानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ बुद्रुक येथे शनिवारी ३८ वर्षीय तातेराव ऊर्फ बंडू मदन वाघ यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.