पुण्याच्या दोन डॉक्‍टरांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत उच्च न्यायालयाने पुण्यातील दोन डॉक्‍टरांना दिलासा दिला.

मुंबई - गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत उच्च न्यायालयाने पुण्यातील दोन डॉक्‍टरांना दिलासा दिला.

पिंपरीतील स्त्रीरोगतज्ज्ञ राजेंद्र सुजनयाल आणि रेडिओलॉजिस्ट श्रीपाद इनामदार हे विविध रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांची तपासणी करायचे. जून 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, आवश्‍यक असलेल्या फॉर्म-एफ अपूर्ण असल्याचे आढळले होते. त्यानंतर या दोन डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाताने भरलेल्या अर्जांवर डॉ. सुजनयाल यांच्या हस्ताक्षरातील स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, संगणकाद्वारे भरलेल्या अर्जांवर प्रिंटेड स्वाक्षरी असल्याबद्दल आक्षेप नोंदविण्यात आले होते.

हा कायद्यातील तरतुदींचा भंग असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, कायद्यातील कोणत्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे, याचे स्पष्टीकरण किंवा पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले नसल्याचे निरिक्षण नोंदवत न्या. प्रभुदेसाई यांनी हा निकाल दिला.

Web Title: Two doctors court relief