ED : गोपनीय माहिती लांबवली; ईडी कार्यालयातल्या दोघांना अटक

ED
EDesakal

मुंबईः गोपनीय माहिती परस्पर लांबवल्याप्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतल्या ईडी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली असून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. गोपनीय कागदपत्र लांबवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पुण्यातील व्यापारी मुलचंदानी यांना गोपनीय दस्तावेज दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मागील काही वर्षांपासून ईडीने राज्यासह देशातल्या अनेक बड्या नेत्यांवर कारवाई केली आहे. मात्र भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा नेहमीच आरोप होतो. सध्या तरी देशात सर्वांच्या नजरा ईडीच्या कारवाईवर लागलेल्याअसतात. मात्र ईडीच्याच कार्यालयात कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com