बिबट्याच्या कातड्यासह सिंधुदुर्गातील दोघे जाळ्यात 

बिबट्याच्या कातड्यासह सिंधुदुर्गातील दोघे जाळ्यात 

ठाणे : ठाण्यात वन्यजीवांच्या अवशेषांची तस्करी वाढू लागली आहे. उपवन तलावाजवळ मंगळवारी (ता. 26) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गातील दोघांना बिबट्याच्या कातड्यासह जेरबंद करण्यात आले. नरेंद्र नामदेव गुरव (39, रा. आचिर्णे, वैभववाडी) आणि अजित अनंत मराठे (33, रा. पिंपळवाडी, कणकवली) अशी या दोघा तस्करांची नावे असून त्यांच्याविरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती येऊर परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. 

सिंधुदुर्ग येथील जंगलातून बिबट्याचे कातडे ठाण्यात विक्रीसाठी घेऊन दोघे जण येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार, वन अधिकारी पवार आणि वनरक्षकांनी उपवन तलाव परिसर आणि भू केंद्र बस स्टॉपजवळ पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार, पाठीवरील बॅगमध्ये बिबट्याच्या कातड्यासह दुपारी आलेल्या दोघाही तस्करांना जेरबंद करण्यात आले. 

वन्यजीव अवशेषांच्या तस्करीचे "ठाणे' 

वन्यजीवांच्या मांस अथवा अवशेषांच्या तस्करीच्या घटना ठाण्यात वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात अहमदनगर येथून आलेल्या एका तस्कराला 10 लाखात बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आणले असताना जेरबंद केले होते. अन्य एका घटनेत मुंबई व कर्नाटक, धारवाड येथील दोघांना बिबट्याच्या कातड्यासह अटक केली होती. जुलै महिन्यात चेना येथे शिकाऱ्याच्या घरातून रानडुकराचे मांस हस्तगत केले होते. तसेच, दुसऱ्या घटनेत बिबट्याच्या कातड्यासह चौघे तस्कर वनविभागाच्या तावडीत सापडले होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही बिबट्याचे कातडे हस्तगत केले होते. तेव्हा, वन्यजीवांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
 

web title : two guys from sindhudurga arrested for leopards skin Smuggling

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com