माघीसाठी पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पंढरपूर - माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. माघी दशमी दिवशी चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी बारा तास लागत होते.

माघी यात्रेनिमित्त नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागेमध्ये प्रशासनाने उत्तम व्यवस्था केलेली असल्याने वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या परिसरात राज्यभरातून आलेले हजारो भाविक तंबू आणि राहुट्यांमधून मुक्कामास आहेत.

राहुट्यांमधून होत असलेल्या भजन कीर्तनामुळे तेथील वातावरण भक्तिमय झाले आहे. चंद्रभागा नदीत स्नानासाठी मुबलक पाणी असल्याने वारकऱ्यांनी आज दशमी दिवशी स्नानाची पर्वणी साधली. हजारो वारकऱ्यांनी स्नानासाठी पहाटे चार वाजल्यापासून नदीच्या दोन्ही तीरावर गर्दी केली होती. नदीत स्नान केल्यानंतर वारकरी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेकडे जात होते.

प्रशासनाच्या वतीने नदीपात्रात आपत्कालीन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 7) माघी एकादशीचा सोहळा होणार असल्याने सोमवारी दिवसभर पायी दिंड्यांमधून आणि एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांतून वारकरी येत होते.

Web Title: Two lakh pilgrims visited Pandharpur for maghi