राज्यातील दोन परिचारिकांना ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

नवी दिल्ली - चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील व जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायक आशा गजरे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली - चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील व जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायक आशा गजरे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली - चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार-२०१९ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे या वेळी मंचावर उपस्थित होते.
देशभरातील ३५ परिचारिका, परिचारिका सहायक आणि महिला आरोग्य सहायिकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. केरळमधील कोझीकोड येथील परिचारिका लिनी साजीश यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या पतीने हा पुरस्कार स्वीकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com