मोठी बातमी! 'अंतिम'च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन संधी

तात्या लांडगे
Tuesday, 22 September 2020

ठळक बाबी...

 • राज्यातील काही जिल्ह्यांत पूर, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांशी होईना संपर्क
 • 13 अकृषिक विद्यापीठांमधील सुमारे पाच टक्‍के विद्यार्थी कोरोनाबाधित
 • राज्यातील 11 लाख 43 हजार नियमित व बॅगलॉगचे विद्यार्थी देणार अंतिम वर्षाची परीक्षा
 • 11.43 लाख विद्यार्थ्यांपैकी 85 टक्के विद्यार्थ्यांनी निवडला ऑनलाईनचा पर्याय
 • नापास तथा संपर्काबाहेरील विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत कधीही देता येईल फेरपरीक्षा
 • सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार पुढील वर्गात प्रोव्हिजनल प्रवेश

सोलापूर : अंतिम वर्षातील बॅगलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून तर नियमित विद्यार्थ्यांची 10 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांअंतर्गत 11 लाख 43 हजार विद्यार्थ्यांकडून परीक्षा (ऑनलाइन की ऑफलाइन) कशी देणार, याची माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, 15 टक्‍के विद्यार्थ्यांशी संपर्कच झालेला नसून पाच टक्‍के विद्यार्थी कोरोनाबाधित तथा त्यांच्या घरातील कोणीतरी पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत.

ठळक बाबी...

 • राज्यातील काही जिल्ह्यांत पूर, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांशी होईना संपर्क
 • 13 अकृषिक विद्यापीठांमधील सुमारे पाच टक्‍के विद्यार्थी कोरोनाबाधित
 • राज्यातील 11 लाख 43 हजार नियमित व बॅगलॉगचे विद्यार्थी देणार अंतिम वर्षाची परीक्षा
 • 11.43 लाख विद्यार्थ्यांपैकी 85 टक्के विद्यार्थ्यांनी निवडला ऑनलाईनचा पर्याय
 • नापास तथा संपर्काबाहेरील विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत कधीही देता येईल फेरपरीक्षा
 • सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार पुढील वर्गात प्रोव्हिजनल प्रवेश

राज्यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार पाण्याखाली गेले आहेत. यासह अन्य काही जिल्ह्यांमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने तेथील विद्यार्थ्यांशी संपर्क झालेला नाही. दुसरीकडे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 10 विद्यापीठांचे दौरे केले. त्यानुसार या विद्यापीठांमधील सुमारे पाच टक्‍के विद्यार्थी कोरोनाबाधित तथा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना डिसेंबर 2020 पर्यंत परीक्षा देण्याची दोन संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील अंतिम वर्षातील 11 लाख 43 हजार विद्यार्थ्यांपैकी 85 टक्‍के विद्यार्थ्यांचा संपर्क झालेला आहे. त्यांच्या परीक्षेचे नियोजन युध्दपातळीवर सुरु असून दहा दिवसांत निकाल जाहीर करुन आगामी महिनाभरात फेरपरीक्षा घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

संपर्क न झालेल्यांचाही होणार फेरपरीक्षा
अंतिम वर्षातील विद्यार्थी ऑनलाइन की ऑफलाइन परीक्षा देणार याची माहिती महाविद्यालयांकडून मागविली आहे. कोरोनाबाधित तथा संपर्क न झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरपर्यंत फेरपरीक्षा घेतली जाईल. आता होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचीही त्याचवेळी फेरपरीक्षा घेतली जाईल.
- सुभाष चौधरी, कुलगुरु, नागपूर विद्यापीठ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two opportunities for finalists to take exams