बेळगावजवळ बस उलटून दोन ठार 

Two people killed in Belgaum
Two people killed in Belgaum

बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस उलटून दोघेजण जागीच ठार, तर 18 जण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठजवळ घडली. आज पहाटे 6.20 वाजता घडलेल्या या अपघातात प्रवासी म्हणून जाणारा वायव्य परिवहन मंडळाचा बसचालक अशोक बसाप्पा दुंडी (वय 39, रा. निच्चनकी, ता. कित्तूर) ठार झाला असून, दुसरा मृत 55 ते 60 वर्षे वयोगटातील आहे. त्याची ओळख पटलेली नाही. जखमीतील चौघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आज सकाळी उडपी डेपोची बस (केए 19 एफ 3077) बेळगावाहून उडपीकडे जात होती. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने महामार्गावरील बडेकोळमठनजीक दुभाजकाला धडकून बस उलटली. त्यात अशोक दुंडी हा उडपी डेपोचा बसचालक होता. काम संपवून तो बसमधून गावाकडे जाण्यासाठी प्रवासी सीटवर बसला होता. अपघातानंतर महार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

काहींनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. हिरेबागेवाडी पोलिसांनी पंचनामा केला. क्रेनच्या साहाय्याने बस हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. निष्काळजी व बेजबाबदारणे बस चालविण्याने हा अपघात घडल्याचा ठपका ठेवून जखमी चालक शिवानंद लंकेण्णवर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com