औंरगाबाद-दिल्लीसाठी लवकरच दोन विमाने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट मिळत नसला, तरीही दिल्लीसाठी मात्र लवकरच दोन विमाने सुरू होण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. स्पाईस जेट आणि झूम एअरवेजने दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

दिल्लीसाठी औरंगाबादेतून केवळ एक विमान आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आणखी विमाने सुरू करण्याची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची यंत्रणा सुसज्ज झालेली आहे. आगामी वीस वर्षांपर्यंत विमानतळ विस्तारीकरण करण्याची गरज नाही, अशा पद्धतीची यंत्रणा विमानतळावर आहे. त्यामुळे आता केवळ विमानसेवा कशा वाढतील, यावर विमानतळ प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबादेतून सचखंड एक्‍स्प्रेस व अन्य मार्गाने दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन स्पाईस जेट आणि झूम एअरवेज या दोन कंपन्यांनी दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. 

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची यंत्रणा दर दिवशी दहा ते पंधरा विमाने चालवू शकते. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. हिवाळ्यामध्ये दिल्लीसाठीची नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
-डी. जी. साळवे, विमानतळ निदेशक 

Web Title: Two planes soon for the Aurangabad-Delhi