पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

वाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील शिंदेवाडी (उचाट) येथील शिंदे परिवाराकडे रविवारच्या सुट्टीची मजा घेण्यासाठी मुंबई येथील मालाडहून जवळपास 35 लोक सकाळी आले होते. तर दुपारच्या जेवणानंतर पुन्हा माघारी जाण्याचा त्यांचा बेत होता. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाच-सहा तरुण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी प्रसाद शिंदे (26, मालाड, मुंबई) व अनिष मोरे (25, उल्हासनगर) हे दोघे पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना त्यांचे सहकारी व गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढून खुपरी येथील कल्याणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रदीप जाधव यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Two Youth Dead drowned in the river