PUB G खेळणाऱ्या दोघांना रेल्वेने चिरडले; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

PUB G खेळणाऱ्या दोघांना रेल्वेने चिरडले; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : आईने पब्जी गेम खेळण्यास विरोध केल्याने एका 14 वर्षीय मुलाने औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. आकाश ओस्तवाल (वय 14) असे या मुलाचे नाव असून ओस्तवाल कुटुंब नाशिक मधील शिवाजी नगर परिसरात राहते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी आकाश मोबाईलर पब्जी गेम खेळत होता. बऱ्याच वेळापासून गेम खेळत असणाऱ्या मुलाच्या हातून आईने ओढून घेतला. त्यामुळे चिडलेल्या आकाशने रागाच्या भरात विषारी औषध प्यायले. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.

दुसरी घटना
पब्जी गेळ खेळणाऱ्या दोघांना रेल्वेने उडविले

दोन दिवसांपुर्वीच पब्जी गेम खेळण्यात दंग असणाऱ्या हिंगोलीतील दोन तरुणांना रेल्वेने चिरडले. नागेश गोरे (वय 22), स्वप्नील अन्नपुर्णे (वय 24) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण हिंगोलीतील हनुमान नगर भागातील रहिवाशी होते. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोघे मित्र हिंगोलीतील खटकाळी बायपास येथील रेल्वे रुळावर उभी केलेल्या दुचाकीवर बसून मोबाईलवर पब्जी गेम खेळत होते. दोघे गेम खेळण्यात एवढे मग्न झाले की रेल्वे आल्याचेही भान त्यांना राहिले नाही. त्याच वेळात आलेल्या अजमेर-हैद्राबाद एक्सप्रेसने दोघांना धडक दिली. या मध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

पब्जी गेम चे आकर्षण लहान मुलांपासून तरुण असे सर्वांन मध्येच आहे. मुल या मध्ये एवढी गुंतून जात आहेत की त्यांना वेळेचे, आजूबाजूच्या घडामोडीचेही भान रहात नाहीत. यामुळे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होते आहे. लहान मुल चिडचिडी, रागीट होत आहेत. अनेक तरुण त्यांच्या आयुष्यातील अमुल्य वेळ या गेमच्या नादात वाया घालवत आहेत. या गेमवर गुजरात राज्यात बंदी घालण्यात आले आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com