महाराष्ट्रातील 'या' भाजपनेत्याला मिळणार केंद्रिय मंत्रीपद; राज्यसभेवर होणार नियुक्ती?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत साताऱ्याच्या माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या खासदारकीचाही राजीनामा दिला होता. परंतु पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. 

पुणे : विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत साताऱ्याच्या माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या खासदारकीचाही राजीनामा दिला होता. परंतु पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता त्यांचा पराभव झाल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची परत दिल्ली वारी निश्‍चित मानली जात आहे. त्यांची राज्यसभेवर निवड निश्चित मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, त्यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड करण्यात येणार असून, त्यापाठोपाठ केंद्रात मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाक जास्त आमदार निवडून येऊनही भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. या परिस्थितीत आपली ताकद पुन्हा वाढविण्याची तयारी भाजपने पुन्हा उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद देऊन सातारा  जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Image result for udayanraje bhosale


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayanraje bhosale may takes oath as Central minister