
Udayanraje Bhosale News: "…तर देवाशपथ सांगतो मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन"; उदयनराजेंचं ओपन चॅलेंज
Udayanraje Bhosale News: साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात तसेच दोघेही टीकेची एकही संधी सोडत नाहीच.
सातारा नगरपालिकेचा कारभारावरून उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांना उदयनराजेंनी त्यांच्या स्टाइलमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
तसं कोणी बोललं तर देवाशपत्तसांगतो मिश्या काय भुवया पण काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही. आज साताऱ्यात फक्त लोकांची सेवा करण्यासाठी आहे. आम्हाला वारसा मिळालायो तो पुढं नेत आम्ही जपतो.
यांच्या आगोदरच्यानी काय जपलंय. बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोला, तुम्ही सांगा पुरावे काय ते, असे उदयानराजे म्हणाले आहेत.
हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
"ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत.
तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली", असेही उदयनराजे म्हणाले.(Marathi Tajya Batmya)
"आम्हाला नावे ठेवा; पण तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा.
एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही", असं थेट चॅलेंज उदयनराजे यांनी दिलं.(Latest Marathi News)