Udayanraje Bhosale: 'मेलो असतो तर बर झालं असतं..'उदयनराजे भावूक

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान, कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच, खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मेलो असतो तर बर झालं असतं. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपालांच्या विधानावर शिवप्रेमी संघटनाशी चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले उदयनराजे?

राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. असा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार. असा सवाल उपस्थित केला.

शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं? शिवरायांचा अपमान होतो तेव्हा दुःख होते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराजांच नाव घेण्याचा कुणालाल अधिकार नाही. राज्यापालांवर कारवाई का केली नाही. अशी विचारणादेखील राजे यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. तसेच, ३ डिसेंबरला राडगडावर धरणं आंदोलन करणार असल्याची माहिती उदयनराजे यांनी यावेळी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार. असही यावेळी ते म्हणाले

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची शिकवण दिली. सांगितल्याप्रमाणे सर्वांशी बोललो. त्यांचे नावं घेता तर त्यांच्या विचारांचा अजेंडा हवा. असही राजे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com