भाजप प्रवेशाबाबत उदयनराजेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

- भाजप प्रवेशाबाबत उदयनराजेंचे स्पष्टीकरण
 

सातारा : खा. उदयनराजे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पहिल्यांदाच प्रतिक्रीया देताना त्यांनी भाजप प्रवेशाबाबत नकार दिला आहे.

मी पूर परिस्थितीचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले आहे. भाजपमध्ये जाणार म्हणून 2 दिवस चर्चा सुरू होत्या. परंतु, आज (ता.22) उदयनराजेंनी या गोष्टीला नकार दिला.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दादा राजे खर्डेकर यांच्या निधनानंतर आज फलटणमधील आसू या त्यांच्या गावी उदयनराजेंनी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी भाजप प्रवेशावर बोलताना ते मी पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी गेलो होतो असे सांगून भाजपचे माढ्याचे खा.रणजितसिंह निंबाळकर यांना मिठी मारत हा माझा जुना मित्र भेटला आनंद झाला असे सांगितले.

शिवाय, भविष्यातील राजकीय वाटचाली बाबत विचारले असता संघर्षातून उभे राहिलेले कधी कोणा पुढे झुकत नसतात आणि लोकांसाठी तर नाहीच त्यातले मी आणि रणजित आहोत असे वक्तव्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayanraje Clarifies about BJP Entrance