उदयनराजे म्हणतात, हे पाप कोण फेडणार? (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कृष्णा खोऱ्याचं पाणी ज्या त्या ठिकाणी पोहचलं असतं तर, हा भाग आणखी विकसित झाला असता. इथली संपूर्ण पिढी विकासकामापासून वंचित राहिलेली पाहायला मिळत आहे, मग हे पाप कोण फेडणार? असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

सातारा : खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी पहिली प्रतिक्रीया दिली असून मी नाराज नाही पण सत्तेत असताना जे कामं व्हायला हवी होती ती कामे झाली नसल्याचे उदयनराजे यांचे म्हणणे आहे. हा भाग विकसित झाला नाही. कृष्णा खोऱ्याचं पाणी ज्या त्या ठिकाणी पोहचलं असतं तर, हा भाग आणखी विकसित झाला असता. इथली संपूर्ण पिढी विकासकामापासून वंचित राहिलेली पाहायला मिळत आहे, मग हे पाप कोण फेडणार? असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

उदयनराजेंचं ठरलंय ! मावळा मन वळविण्यात अयशस्वी

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेली भेट ही सहज घेतलेली भेट होती. जे भेटतात त्यांना आपण सहज भेटतो, अशी प्रतिक्रीया देत विणवणीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. तसेच,  ते पुढे म्हणाले की, भाजप प्रवेशाच्या चर्चा होणे सहाजिक आहे. कारण उदयनराजेंच्या नावाभोवती ग्लॅमर तेवढे आहे. पण, उदयनराजे हे काही संकुचित बुद्धीची व्यक्ती नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सत्ता आहे म्हणून तिकडे जाणे योग्य नाही- उदयनराजे

दरम्यान, लोकांच्या हिताचे जर कोणी चांगले प्रपोजर दिले तर कोणत्या पक्षात जायचे त्याचा विचार करू असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादीत नाराज नाही मात्र, जी ती कामे ज्या त्यावेळी करून या भागाचा आणखी विकास करता आला असता, असेही मत यावेळी उदयनराजेंनी मांडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udayanraje Clarifies about meeting of Dr. amol kolhe