उद्धव आणि आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला; निर्णय होणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना आमदारांची मातोश्री येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव आणि आदित्य शरद पवारांच्या भेटीला रवाना झाले आहेत. या दोघांमध्ये कोठे बैठक होणार हे अद्याप निश्चित नाही. पण, या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर राजकीय परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

मुंबई : राज्यातील सत्तेचा पेच सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे सत्ताकेंद्र शरद पवार झाले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा : मुनगंटीवार

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना आमदारांची मातोश्री येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव आणि आदित्य शरद पवारांच्या भेटीला रवाना झाले आहेत. या दोघांमध्ये कोठे बैठक होणार हे अद्याप निश्चित नाही. पण, या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर राजकीय परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नकटं असावं पण, धाकटं असू नये; शिवसेनेला आला प्रत्यय 

या तिन्ही पक्षांचे जाहीरनामे वेगवेगळे असले तरी, यांचा अभ्यास केला जात आहे. त्यानंतर राज्यासाठी एकत्र कार्यक्रम राबविला जाणार आहे. आता चार वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापूर्वी शिवसेनेने आपल्या आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. तर, काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray and Aditya Thackeray meets NCP chief Sharad Pawar in Maharashtra