ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी...शिवसेनेच्या रणरागिणीने घेतली शपथ : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray: ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी...शिवसेनेच्या  रणरागिणीने घेतली शपथ

Uddhav Thackeray: ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी...शिवसेनेच्या रणरागिणीने घेतली शपथ

राज्यात ८ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतःहून मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतचं दिलेल्या निकालामुळे ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावलं. त्यानंतर राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एका रणरागिणीने उद्धव ठाकरेंसाठी देवी मातासमोर शपथ घेतली आहे.

जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ शिवसेना कार्यकर्त्या आशा रसाळ यांनी घेतली आहे. मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी आशा रसाळ यांनी साकडं घातलं.

..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आशा रसाळ यांनी घेतली शपथ...

‘आज महाराष्ट्रावर संकट आलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही…’ अशी शपथ रसाळ यांनी घेतली आहे.

LIVE Update : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरवात; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray