गायऐवजी देश वाचवण्याची गरज - उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

भाजपची पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याच स्वप्न कधी बघणार? मी ईव्हीएम मशीनला दोष देत नाही. मात्र, या मशीनबद्दल माझा एक आक्षेप आहे, माझं मत कुणाला गेलं, हे मला कळू शकत नाही. हा लोकशाहीतला अधिकार नवीन ईव्हीएमने हिरावून घेतला.

मुंबई - एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान सुधारणार नाही. पाकिस्तानमध्ये घुसा आणि पाकिस्तानचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. गाय वाचवण्याची गरज नाही, देश वाचवण्याची गरज आहे, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही बोललो, तर अस वाटतं की आम्ही विरोधात बोलतो आहोत,  हरलो बिरलो याचा काही प्रश्न नाही. उतरप्रदेशाच्या यशाबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. मात्र गोव्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे दुर्लक्ष करत येणार नाही. गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता, तरीही भाजपपेक्षा 4 जागा काँग्रेसला मिळाल्या. शेतकरी जेव्हा आपलं कौतुक करतो तेच आपलं यश मला कोणतरी म्हटले उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे, ही प्रतिमा आहे.

भाजपची पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याच स्वप्न कधी बघणार? मी ईव्हीएम मशीनला दोष देत नाही. मात्र, या मशीनबद्दल माझा एक आक्षेप आहे, माझं मत कुणाला गेलं, हे मला कळू शकत नाही. हा लोकशाहीतला अधिकार नवीन ईव्हीएमने हिरावून घेतला. मध्यावधी निवडणुका उद्या कशाला? आजच घ्या. आपला एकच नेता शिवसेनाप्रमुख एकच चिन्ह, एकच ध्येय आणि एकच भूमिका लोक कल्याण. साहेबाना लोक ईश्वर मानायचे, मला यांचा अनुभव आहे माझा परिचय लोक भगवान का बेटा असा करतात, साहेबांनी शिवसैनीक हाच परिवार मानला आपली जबाबदारी मोठी आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा सत्ता राहों न राहो.

Web Title: Uddhav Thackeray criticize BJP and Narendra Modi