विष्णुचा अकरावा अवतार बरोबर असताना का काही होत नाही: उद्धव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या विष्णुचा अकरावा अवतार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुमच्यासोबत आहे, मग तो काही बदलू शकत नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या विष्णुचा अकरावा अवतार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुमच्यासोबत आहे, मग तो काही बदलू शकत नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

देशात पेट्रोल, डिजे, गॅसचे भाव रावण बनून उभे आहेत. आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून देशद्रोही, देशविरोधी म्हटले जाते. पण आज देशात सुरू असलेला कारभार तुम्हाला मान्य आहे का? राज्यात दुष्काळाचा राक्षस उभा आहे. पुढचा पावसाळा कधी लवकर आला तर बर. मराठवाडा होरपळतोय मग अशा वेळी सरकारच्या विरोधात बोलायला नको का. असे बोलत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर कठोर टिका केली. हेच सांगताना त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या आठवणी सांगितल्या. सरकारे येतील आणि जातील पण देश टिकाल पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

सरकारने एक सर्जीकल स्ट्राईक केले. पण त्यानंतर आमच्या सैनिकांच्या हत्या थांबल्या का? त्यानंतर किती सैनिक मारले गेले हे सरकार सांगत नाही. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. पण रमजाणच्या काळात शस्त्रबंदीची घोषणा कोणासाठी केली होती. काश्मिर मधल्या दहशतवाद्यांसाठी याची उत्तरे या सरकारनी द्यावीत. अंतरराष्ट्रीय पातळीवरील रुपयाची किंमत ढासळत असताना ठाकरे यांनी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची एक आठवण सांगितली. तेव्हा डॉलरची किंमत 37 रुपये होती. प्रमोद महाजनांना एकानी प्रश्न विचारला होता की, तुमचे देशा विषयीचे स्वप्न का. तर महाजन म्हणाले होते. डॉलरची किंमत 37 रुपये आहे. माझ्या देशाचा एक रुपाया 37 डॉलर एवढा झाला पाहिजे. पण आज उलट होत आहे. डॉलरची किंमत 74 रुपयांपर्यंत गेली आहे. याची उत्तरे सरकाने द्यावीत.

उद्धव ठाकरे म्हणाले - 
- राम मंदिराबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मत व्यक्त केले आहे
- राम मंदिर कधी बांधणार माहिती नाही
- मी अयोध्येला जाणार आहे, 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार 
- मी तेथे जाऊन मोदींना विचारणार आहे, तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नका
- प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखांप्रमाणे राम मंदिर जुमला ठरू नये
- हा विषय श्रीरामाचा आहे, साधा विषय नाही
- चार वर्षांत पंतप्रधान एकदाही अयोध्येला गेले नाहीत, का?
- ज्या उत्तर प्रदेशमधून निवडून गेलात तेथे कधी गेला नाही
- एकदा सांगून टाका तुम्ही मंदिर बांधता की आम्ही मंदिर बांधू 
- नितीन गडकरी तु्म्ही मराठी आहात, खोटे बोलणे महाराष्ट्राची संस्कृती नाही
- शिवसेनाप्रमुख म्हणायचे शब्द द्यायचा असेल तर विचार करून दे
- तुम्ही निर्लज्जपणा करत आहात, हा तुम्हाला शोभत नाही
- लोक आता दिलेल्या वचनांबद्दल विचारत आहेत, काय उत्तर देणार
- तुम्ही दिलेली आश्वासने विसरला तरी आम्ही विसरणार नाही

Web Title: Uddhav Thackeray criticize bjp government