...तर माझा घसा बसेल - उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. गुंडाचा पक्ष झाला आहे की काय, अशी प्रतिमा भाजपची झाली आहे. कृष्णाचा नाव घेऊन कोणी कृष्ण होत नाही. आम्हाला आधुनिक भारत, मुंबई घडवायची आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर मी जास्त बोलत नाही. मी बोलले तर, माझा घसा बसेल. भाजपला काय आरडाओरडा करायचा आहे, तो करु द्या, असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लगाविला.

शिवसेनेला औकात दाखवून देऊ, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर आज (रविवार) उद्धव यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेस नेते देवेंद्र आंबेरकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, की भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. गुंडाचा पक्ष झाला आहे की काय, अशी प्रतिमा भाजपची झाली आहे. कृष्णाचा नाव घेऊन कोणी कृष्ण होत नाही. आम्हाला आधुनिक भारत, मुंबई घडवायची आहे. राम मंदिर वही बनायेंगे असे सांगत असतील मात्र कधी माहिती नाही. आम्ही जे केले आहे, ते करून दाखविले आहे. गुंडांचा नेता अशी मुख्यमंत्र्यांची इमेज झाली आहे. आपण केलेली कामे घेऊन जनतेसमोर जायचे आहे. लाल किल्ल्यावर भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही. तसे स्वतःला पांडव म्हटल्याने कोणी पांडव होत नाही.

Web Title: Uddhav Thackeray criticize Devendra Fadnavis