मोदींच्या आधी फडणवीसशी निपटा... 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - "मोदींच्या आधी फडणवीसशी तर निपटा...', असं प्रतिआव्हान देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपने आक्रमक लढाईचे थेट आव्हान दिले. तसेच मुंबईच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून केवळ मुख्यमंत्र्यांनाच मैदानात उतरवले जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईच्या प्रचारापासून दूर ठेवले जाणार असल्याचेही संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका-टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आव्हान दिले. ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवतानाच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केले होते. प्रचार सभेत काल "पंतप्रधान मोदींची सभा कधी होणार याची मी वाट बघतोय. मुंबईत "मित्रों...' असा आवाज ऐकू आला तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इथे मोदींची सभा झाली तरी विजय शिवसेनेचाच होईल, असे ठणकावत त्यांनी भाजपला डिवचले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी आज रोखठोक प्रत्युत्तर दिले. 

मोदी यांची सभा झाल्यानंतरही शिवसेनाच कशी विजयी होते हे मला दाखवून द्यायचे आहे, असे खुले आव्हान उद्धव यांनी दिले होते. शिवसेनेच्या या आव्हानाचा मुख्यमंत्र्यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्घ करताना चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेच्या विरोधात लढण्यासाठी "मोदींच्या आधी फडणवीसशी तर निपटा', असे प्रतिआव्हान देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आव्हानातील हवा काढून टाकली. तसेच मुंबईच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्याच प्रतिमेचा भाजप वापर करणार असून, तेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट झाले. 

"पाच वर्षे पूर्ण करणार' 
राज्य सरकारमध्ये भाजपबरोबर सत्तेत असलेली शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची हुलकावणी देत असली तरी, त्याला भाजप जुमानणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. "राज्य सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून, सरकार स्थिर असल्याचे' मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

Web Title: uddhav thackeray & devendra fadnavis politics