नाराज शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंचा संवाद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - गावाकडून थेट मुंबईत शेतीमाल आणून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना महापालिका प्रशासन त्रास देत असल्याने मंत्रालयाच्या दारात भाजी फेकून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला.

शिवसेना भवनामध्ये झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. महापालिका प्रशासन व शिवसेना या शेतकऱ्यांच्या सोबत सतत राहील, अशी ग्वाही देत कोणत्याही त्रासापासून सहकार्य व संरक्षण देण्यासाठी मुंबईतला शिवसैनिक या शेतकऱ्यांच्या सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

या वेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना नेते संजय राऊतदेखील उपस्थित होते. मुंबईत शेतकऱ्यांना शेतीमाल विकताना काय त्रास होतो, याची माहिती या वेळी शेतकऱ्यांनी ठाकरे यांना दिली. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्याचे आदेश ठाकरेंनी महापौर महाडेश्वरांना दिले.

Web Title: uddhav thackeray discussion with angry farmer