esakal | मुख्यमंत्री कोण? शिवसेनेकडून 'ही' नावे चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Aditya Thackeray are race in CM POst

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज सत्ता स्थापनेचा हा संघर्ष संपला आहे. आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसकडून पाठिंब्याचा मेल पाठवला आहे. तर राष्ट्रावादीकडून राज्यपालांना शिवसेनला पाठिंबा दिल्याचा फॅक्स करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कोण? शिवसेनेकडून 'ही' नावे चर्चेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष चालू असताना आज सत्ता स्थापनेचा हा संघर्ष संपला आहे. आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसकडून पाठिंब्याचा मेल पाठवला आहे. तर राष्ट्रावादीकडून राज्यपालांना शिवसेनला पाठिंबा दिल्याचा फॅक्स करण्यात आला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले असताना आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे शिवसैनिकांना वाटत आहे. सोबतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा चालू आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे असे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. परंतु, शेवटी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार हे अजून तरी जाहीर करण्यात आलेले नाही.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री साताऱ्याचा होणार?

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णमुळे महाशिवआघाडीचे राज्यात सरकार येणार आहे. काँग्रेसने पाठिंबा देण्याचे जाहीर करताच राष्ट्रवादीकडूनही शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले.