
Uddhav Thackeray News : ...तर राज्यपाल पद रद्द करावं; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. यानंतर आज (१२ मे) उद्धव ठाकरे यांनी देखील सत्तासंघर्षादरम्यान राज्यपालांची वर्तवणूक घृणास्पद होती अशा शब्दात तात्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला.
महाराष्ट्र सत्तासंघर्षदरम्यान राज्यपालांच्या भूमिकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यापालांची भूमिका ही अत्यंत घृणास्पद आहे. निवडणूक आयुक्त नेमण्याची देखील एक प्रक्रिया असली पाहिजे असं मी म्हणालो होतो. सुदैवाने त्याच सुमारास सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि निवणूक आयुक्त नेमताना त्यात कोण असलं पाहिजे याबद्दलही नियमावली दिली आहे. तसेच राज्यपाल ही संस्था आपल्या घरगड्याप्रमाणे वापरली जात असेल तर ती बरखास्त केली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही राजकारणी लोकप्रतिनीधी असतो, त्यात लोकप्रतिनीधीवर वरून लादलेला माणून ही शोभेचं पद नाहीयेत तर ती उपद्व्यापी पदं आहे, राज्यपाल संस्था एकतर बरखास्त करावी किंवा राज्यपाल नियुक्ती करताना काही नियमावली किंवा संस्था असायला हवी असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही यंत्राना खरी आणि आदरपूर्वक असायला हवी, जी पूर्वी होती. पण हव्यासापायी याची बरबादी करून टाकली आहे, म्हणून जोपर्यंत या राज्यपाल नियुक्तीवर काही नियमावली येत नाही तोपर्यंत सरळ हे राज्यपाल पद रद्द करावं असे उद्धव ठाकरे म्हणाले.