Uddhav Thackeray : ठाकरे गटाचं ठरलं! आजच्या बैठकीत आखली योजना; खेड्यापाड्यात पोहचून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचं ठरलं! आजच्या बैठकीत आखली योजना; खेड्यापाड्यात पोहचून...

Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मोठी योजना आखली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी पदाधीकाऱ्यांची भेटी-गाठी घेण्यास सुरूवात केली.

बैठक संपल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाची तांत्रिक माहिती जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे. कारण निकाल विरोधात लागला असताना पेढे वाटत आहेत. हा निकाल ग्रामीण पातळी शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

शिवसेनेचा वर्धापन दिन देखील मोठ्या प्रमाणात साजरा होणार होणार आहे. मोठ्या जल्लोषात वर्धापन दिन साजरा होणार आहे.  

बैठकीत काय झालं -

सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवा

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे गट आणि भाजप संभ्रम निर्माण करत आहे. हे लोकांना समजावून सांगा.

सुप्रीम कोर्टाच्या निकालातील आपल्या बाजूचे सकारात्मक मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवा

प्रतोद म्हणून भरत गोगावले आणि गटनेते म्हणून शिंदेंना कोर्टानं बेकायदेशीर ठरवलं, जनतेला पटवून द्या.

अजय चौधरी गटनेते आणि सुनील प्रभू शिवसनेचे प्रतोद, कोर्टानं शिक्कामोर्तब केलं केलं आहे. जनतेपर्यंत पोहचवा.

निवडणूक आयोगानं विधीमंडळातील बहुमताच्या आधारे निर्णय घेऊ नये, कोर्टानं हे स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray