Uddhav Thackeray : निवडणूक आयोग नव्हे चुना लावणारा आयोग; उद्धव ठाकरे कडाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray faction symbol

Uddhav Thackeray : निवडणूक आयोग नव्हे चुना लावणारा आयोग; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई - शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुखांच्या सभा मी पाहिल्या आहेत. बाळासाहेब बोलायचे समोर जगदंबेचं रूप दिसतं. आज तेच चित्र समोर आहे. आज माझ्या हातात काहीच नाही. मी काहीही देऊ शकत नाही. तरी तुम्ही माझ्यासाठी आला आहात. तुमची अशीच साथ मला हवी आहे. जे भुर्टे आहेत, चोर आहेत, गद्दार आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही नाव, चिन्ह चोरू शकता पण शिवसेना चोरू नाही शकतं. तुम्हाला शिवसेनेचे धनुष्य पेलणार नाही. तिकडे रावण उताणा पडला होता. तिथे मिंधे काय उभे राहणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मला निवडणूक आयोगाला सांगायचं की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर येऊन पहावं शिवसेना कोणाकडे आहे. तो चुना लावणारा आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.