उद्धव यांनी घेतली मोहन भागवतांची भेट

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या उद्धव यांनी सकाळीच संघाच्या मुख्यालयात जाऊन भागवतांशी चर्चा केली. उद्धव आणि भागवत यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र उघड करण्यात आलेला नाही.

नागपूर - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. नागपुरमधील संघाच्या मुख्यालयात उद्धव यांनी सुमारे तासभर भागवत यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या उद्धव यांनी सकाळीच संघाच्या मुख्यालयात जाऊन भागवतांशी चर्चा केली. उद्धव आणि भागवत यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र उघड करण्यात आलेला नाही.

राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप यांची युती जुनी असली तर अलिकडील काळात या दोन पक्षांतील संबंध ताणलेले राहीले आहेत. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेने कडक टीका केली आहे. या पार्श्‍वभूमीवर; तसेच महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या पार्श्‍वभूमीहरही ठाकरे व उद्धव यांची झालेली चर्चा अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. उद्धव यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही भागवत यांची भेट घतली.

Web Title: Uddhav Thackeray meets RSS chief Mohan Bhagwat