मराठा क्रांती मोर्चा: उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

मराठा क्रांती मोर्चाला मराठा मुका मोर्चा असे संबोधल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट आदेश देण्याची मागणी फिर्यादीच्या वकिलांकडून न्यायालयात केली आहे.

मुंबई: मराठा क्रांती मोर्चाला मराठा मुका मोर्चा असे संबोधल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट आदेश देण्याची मागणी फिर्यादीच्या वकिलांकडून न्यायालयात केली आहे.

दोन वर्षापूर्वी मराठा समाजाने त्यांच्या मागण्यासाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे काढले होते. त्यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या मोर्चांचा उल्लेख 'मराठा क्रांती मुका मोर्चा' असा करण्यात आला होता. अशा आशयाचे त्यावेळी सामनामध्ये व्यंगचित्र छापून आले होते. याच्याविरोधात दत्ता सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे पुसद न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. 

तक्रार दाखल केलेल्या फिर्यादीच्या वकिलांनी म्हटले आहे की, आरोपीविरूद्ध समन्सची बजावणी होऊनही आरोपी मागील तारखेपासून न्यायालयात तारखेला हजर राहत नाही. आरोपी हे प्रकरण लांबविण्याच्या उद्धेशानेच न्यायालयात हजर राहत नसल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे तरी, आरोपीविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्यात यावे अशी मागणी फिर्यादीने केली आहे.

Web Title: Uddhav Thackeray might be issued Arrest warrant for criticizing Maratha Kranti Morcha