उद्धव ठाकरेंसह सहा मंत्री घेणार शपथ; एक नाव आश्चर्यकारक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (गुरुवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन आमदार शपथ घेणार आहेत. यामध्ये एक नाव आश्चर्यकारक असून, काँग्रेसने नाना पटोले यांना स्थान दिल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (गुरुवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन आमदार शपथ घेणार आहेत. यामध्ये एक नाव आश्चर्यकारक असून, काँग्रेसने नाना पटोले यांना स्थान दिल्याची माहिती मिळत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने त्या पदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अजित पवार यांना हे पद देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. परंतु, पक्षाविरुद्ध बंड केल्याने त्यांच्याविरुद्ध काहीसा नाराजीचा सूरही आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले मत जयंत पाटील यांच्या पारड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

फडणवीस आज दुपारी 'वर्षा' सोडणार; आवराआवर सुरु

महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिपदांच्या वाटपाचेही सूत्र ठरले असून, त्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय, देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

आता उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. तर, राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते शपथ घेतील. तर, काँग्रेसकडून एक आश्चर्यकारक नाव पुढे आले आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार 3 डिसेंबरनंतर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray oath with six minister