Uddhav Thackeray : प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर सरकार पडणार ; उद्धव ठाकरेंना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर सरकार पडणार ; उद्धव ठाकरेंना विश्वास!

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगाव येथील रिफायनी विरोधकांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे आणि भाजवर टीका केली. नारायण राणे यांना देखील त्यांनी टोला लगावला.

माझ्या काळातील प्रकल्प महाराष्ट्राल द्या. चांगले प्रकल्प राज्याबाहेर गेले, वाईट प्रकल्प राज्यात आले. रिफायनरी बारसूत आणण्यासाठी मोठ काळंबेरं आहे. महाराष्ट्राला राख आणि गुरजारतला रांगोळी, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का फिरवता, असा सवाल देखील त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंचा सुक्ष्म असा उल्लेख केल. राणांनी आता आत्मा विकला असेल, असे ठाकरे म्हणाले. हे सरकार कोसळणार आहे. शिंदे-भाजप सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. नारायण राणेंची सुक्ष्म जबाबदारी वाढली आहे. प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर हे सरकार पडणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

३७ आंदोलकांना तडीपार केले आहे. आधी नारायण राणे यांनी देखील रिफायनरीला विरोध केला आहे. प्रकल्प चांगला आहे तर मग पोलीस बळाचा वापर का करता, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.