
Video : "देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो"; चालू भाषणात कार्यकर्त्यांच्या घोषणा, उद्धव ठाकरे म्हणाले…
मुंबईत आज महाविकास आघाडींच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बेठकीत मविआच्या प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन खरण्यात आले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो अशा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला. यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय बनली आहे.
आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे कार्यकरत्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. अनेक क्रांतीकारकांनी देशासाठी बलिदान केलं. नरेंद्र मोदी यांच्यासाठी केलं नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तर शपथ घ्या की..
पुढे बोलताना ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले की, आम्ही नेते मंडळी भेटत असतो पण तुम्हा कार्यकर्त्यांना देखील गावपातळीवर तीन्ही पक्षांना एकत्र भेटावं लागेल. जर आपण लढणार असू, लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर असेल तर शपथ घ्या की, पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल, पण भाजप किंवा शिंदे गटाशी युती करणार नाही ही पहिली तयारी करा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठारेंची प्रतिक्रिया काय होती?
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी "देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो" अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, काही हरकत नाही. पण सगळे एकत्रित लढा. नाहीतर आपण तुझं-माझं करत तंगड्यात तंगडं घालायला लागलो तर आपण इकडंच राहू आणि घोषणा देणारे पण इकडेच राहतील.
पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान पद हे फार मोठं स्वप्न आहे. आधी गाव पातळीवर एकत्र येऊन दाखवा. गावपातळीवर एकत्रित झालो की पुढचं सगळं काम सोपं होईल, पुढे सभा नाही घेतली तरी चालेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.