मुंबई आणि ठाण्याची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई आणि ठाणे शहरांच्या निवडणुकीवर माझे लक्ष आहे, तुम्ही ग्रामीण भागात जोर लावा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याचे समजते.

मुंबई - मुंबई आणि ठाणे शहरांच्या निवडणुकीवर माझे लक्ष आहे, तुम्ही ग्रामीण भागात जोर लावा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याचे समजते.

महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या मंत्र्यांची "मातोश्री'वर बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मंत्र्यांना सक्‍त आदेश दिले आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिकांची निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची आहे. 2012 मधील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर शिवसेनेची युती होती. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ही युती तुटली. हे शिवसेनेच्या अत्यंत जिव्हारी लागल्याने शिवसेनेने सावध पावित्रा घेतला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुंबई आणि ठाणे शहरांच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेणार आहेत. इतर महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. त्यानुसार कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाणार आहे. लवरकच जिल्ह्यांचे वाटप होणार आहे. त्यानुसार मंत्र्यांना प्रचार दौरे, डावपेच आखावे लागणार आहेत.

Web Title: uddhav thackeray responsibility to mumbai thane