दुपटीहून अधिक ऑक्सिजनची गरज - उद्धव ठाकरे

तिसऱ्या लाटेबाबत अंदाज; व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही
uddhav thackarey
uddhav thackareysakal

सांगली : कोरोना (corona)रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. प्रत्येकाने मास्क वापरण्यासह सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याला प्रतिदिन १,८०० टन ऑक्सिजनची गरज भासली ती तिसऱ्या लाटेत दु्पटीहून अधिक लागेल, असा इशारा केंद्र सरकारने (central government) दिला. तो गांभीर्याने घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या दुकाने सुरु करण्याच्या कोणत्याही धमक्या, इशाऱ्यांना मी घाबरत नाही. तरीही स्थानिक परिस्थिती पाहून रात्री ८ पर्यंत दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज स्पष्ट केले. (uddhav thackeray say more than double oxygen)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात १,२५० ते १,३०० टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक १,८०० टन ऑक्सिजनची गरज भासली. ऑक्सिजनचा तुटवडा झाला. त्यावेळी शेजारील राज्याकडून आपल्या राज्याला मदत झाली. पुढच्या संभाव्य लाटेबाबत केंद्रानेदेखील आदेश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुप्पटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. मला विनंती करायची आहे की कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. ऑक्सिजन निर्मिती तातडीने दुप्पट करणे सरकारला अशक्य आहे. एकाचवेळी ऑक्सिजनची मागणी वाढल्यास अन्य राज्यांकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

मुंबईत अद्याप लोकल नाहीच

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सांगली आणि पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच रुग्णवाढ कमी होत नाही. तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवल्या जातील. मुंबई लोकलच्या बाबतीत लगेच निर्णय घेत नाही. कोरोना टाळण्यासाठी सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागण्याची तयारी करावी. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करावे. उद्योगांना आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल, याचा विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com