
'महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि मी मुख्यमंत्री झालो'
मुंबई : मुख्यमंत्री बनणं हे माझे कधीच स्वप्न नव्हते, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली 'मन की बात' सांगितली. आज शुक्रवारी (ता.सहा) मुंबई येथील भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव समारंभात ते बोलत होते. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होईल असे कधी वाटलेही नव्हते. मात्र महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले आणि मी मुख्यमंत्री झालो. मी असे पर्यंत मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच होत राहिल. (Uddhav Thackeray Says Mahavikas Government Formed And I Became Chief Minister)
हेही वाचा: 'डोसा'वरुन तक्रार अन् काँग्रेस नेते शशी थरुर यांचे अजब उत्तर
हे माझे स्वप्न असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. मी मुख्यमंत्री होईल असे माझ्या स्वप्नातही आले नसल्याचे सांगून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले पण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि माझ्यावर राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. मी मुख्यमंत्री होईल, असे मला वाटले नव्हते. पण मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच असेल हे माझे स्वप्न होते. मी असेपर्यंत मुख्यमंत्री माझ्याच पक्षाचा होत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनात प्रवेश,एकनाथ शिंदे म्हणाले...
आज कल्याण-डोबिंवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याचा सेनेला आगामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
Web Title: Uddhav Thackeray Says Mahavikas Government Formed And I Became Chief Minister
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..