मी आणि फडणवीस निर्णय घेऊ - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

मी हिंदू आहे म्हणजे मी हिंदुत्वाच्या नावावर मते मागतोय असा होत नाही. मी हिंदू आहे हे सांगायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही.

मुंबई - युतीचा प्रस्ताव अजून आलेला नाही. आजपासून चर्चा सुरू होईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून तिघे आणि भाजपकडून तिघे अशी चर्चा होईल. शेवटचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून घेऊ, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजप नेत्यांची आज (बुधवार) सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आपणच सर्वस्वी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले -  

  • मी युतीबाबात नकारात्मक असतो, तर चर्चेला माणसे पाठवली नसती युती होण्यामध्ये अजून चर्चा बाकी आहे 
  • जागावाटप करण्याबाबत अजून माझ्याकडे काहीच आलेले नाही. माझा एक फॉर्म्युला आहे. शिवसेना भाजप ही सगळ्यात जास्त टिकलेली युती आहे. ही युती काही पहिल्यांदा होत नाही.  
  • जिल्हा परिषद युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर देणार
  • आज निवडणूक जाहीर होत आहे. लवकरात लवकर चर्चा झाली, तर ठीक नाहीतर कुठेतरी थांबवून एक निर्णय घ्यावा लागेल
  • युतीबाबत अजून माझ्यापर्यंत काही आलेले नाही त्यामुळे माझी तयारी सुरू आहे
  • शिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते ते दूर होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे 
  • 1992/93 पासून गुजराती समाजाने पाहिलंय की कोण त्यांच्या पाठीशी आहे
  • मी हिंदू आहे म्हणजे मी हिंदुत्वाच्या नावावर मते मागतोय असा होत नाही. मी हिंदू आहे हे सांगायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही
  • ज्या दिवशी निवडणुकीची तारीख असेल, त्या दिवशी नोटाबंदीचे 50 दिवस अधिक पुढचे दिवस अशी बेरीज झालेली असेल
  • गोव्यात आमची तीन पक्षांशी चांगली युती झालेली आहे. गोव्यात युती करायची की नाही याबद्दल नाराज कोण आहे? युतीचा निर्णय आम्ही घेतो
Web Title: Uddhav Thackeray talk about collaboration with BJP